बीड
जिल्ह्यात 12 लक्ष 82 हजार वृक्ष लागवडीचे
नियोजन;
सर्वस्तरावरुन सहभागाचे आवाहन
बीड दि. 30 :- महाराष्ट्र शासनाने सन 2017 चे पावसाळ्यात 1 ते 7 जुलै या
कालावधीत राज्यात 4 कोटी वृक्ष लागवडीचे लक्ष्य निश्चित केले आहे. त्याअंतर्गत बीड
जिल्ह्यात येत्या पावसाळ्यात 12 लक्ष 82 हजार वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. या
कार्यक्रमाची अंमलबजावणी व संनियंत्रणासाठी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी
यांच्या अध्यक्षतेखाली विविध शासकीय विभाग, अशासकीय संस्था, पर्यावरण संस्था यांचा
सहभाग असलेली समिती गठीत करण्यात आली आहे. या मोहिमेत लोकप्रतिनिधी, विविध शासकीय
व अशासकीय संस्था, विद्यार्थी, डॉक्टर्स, वकील, पत्रकार असे विविध समाजघटक व
संघटना यांचा सक्रीय सहभाग मिळावा यासाठी आवाहन करण्यात येत आहे.
ही
मोहिम पारदर्शीपणे राबविण्यासाठी रोपवन स्थळ, रोपवाटिका स्थळ तसेच लावण्यात
येणाऱ्या रोपांची स्थिती ऑनलाईन पध्दतीने संनियंत्रीत केली जात आहे. वन
विभागामार्फत वनक्षेत्रात लावण्यात येणाऱ्या जिवंत रोपांची टक्केवारी निश्चित
करण्यासाठी वन विभागातील प्रचलीत मापदंडानूसार योग्य कार्यवाही करण्यात येणार आहे.
इतर शासकीय विभाग तसेच जनसामान्य व अशासकीय संस्थामार्फत करण्यात येणारी लागवड व
रोपांचे संरक्षण तथा संवर्धनाची जबाबदारी त्या-त्या व्यक्तींची व संस्थेची राहणार
आहे. असे जिल्हाधिकारी, बीड यांनी सुचित केले आहे.
बीड
जिल्ह्यात वन व सामाजिक वनीकरण विभागास 7.10 लक्ष वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट असून
प्रत्यक्षात 7.90 लक्ष खड्ड्याचे खोदकाम पूर्ण करण्यात आले आहे. याशिवाय
ग्रामपंचायतींना 3.71 लक्ष व इतर शासकीय विभागांना 2.01 लक्ष उद्दिष्ट असून
त्यांच्याकडील खड्डे खोदकाम प्रगतीपथावर आहे. सदर वृक्ष लागवडीसाठी वन व सामाजिक
वनीकरण विभागाने जिल्ह्यात 28 रोपवाटिका तयार केल्या असून त्यामधून 25 लक्ष रोपे
लागवडीसाठी उपलब्ध होणार आहेत. यामध्ये वड, पिंपळ, पिंपरण, कडूनिंब, सिताफळ,
बांबू, बेल, जांभुळ, करंज इत्यादी प्रजातींचा समावेश असून सदर रोपे नागरिकांसाठी सवलतीच्या दरात उपलब्ध
राहणार आहेत. याशिवाय कृषि विभागाच्या 3 रोपवाटिकांमध्ये आंबा, चिकू, पेरु, डाळींब
इत्यादी सुमारे 63000 रोपे उपलब्ध आहेत.
वृक्ष
संगोपनाच्या दृष्टीने नागरिकांनी लावलेल्या वृक्षांशी त्यांना कायमस्वरुपी जोडणे
आवश्यक आहे. याकरीता महाराष्ट्र हरित सेना ही संकल्पना अंमलात आणली आहे. या सेनेचे
सदस्य होण्यासाठी greenarmy.mahaforest.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक
असून सद्यस्थितीत जिल्ह्यात या सेनेचे 2.91 सदस्य आहेत. जिल्ह्यातील शाळा,
महाविद्यालये, ग्रामपंचायती, विविध शासकीय-अशासकीय संस्था व संघटना यांनी या
उपक्रमात संस्थात्मक सहभाग देण्याचे आवाहन
जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा