शुक्रवार, ५ मे, २०१७

विभागीय आयुक्त डॉ.भापकर यांच्या अध्यक्षतेखाली बीड येथे शनिवारी कार्यशाळेचे आयोजन


                बीड दि.5 :- विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्या अध्यक्षतेखाली शनिवार दि.6 मे 2017 रोजी सकाळी 9 वाजता जिल्हयातील सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी यशवंतराव चव्हाण नाटयगृह, बीड येथे जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
खरीप हंगामाबरोबरच राज्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीकोनातून राबविण्यात येत असलेल्या केंद्र व राज्य शासनाच्या विविध उपक्रम व योजनांचे दि.31 मे 2017 अखेर पर्यंत नियोजन करुन प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी करण्याबाबत या कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच विविध प्रशासकीय विभागाच्या कामकाजाचा आढावाही यावेळी घेण्यात येणार आहे. या कार्यशाळेत जिल्हाधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, सर्व उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी,उप विभागीय कृषी अधिकारी, तहसिलदार,गट विकास अधिकारी, सर्व तालुका कृषी अधिकारी, सर्व कृषी सहाय्यक, सर्व ग्रामसेवक, सर्व तलाठी, मंडळ अधिकारी, जिल्हा प्रशासन अधिकारी,सर्व नगरपालिका/नगरपंचायत यांचे मुख्याधिकारी असे विविध विभागांचे प्रमुख व त्यांचे सहाय्यक अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
-*-*-*-



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा