बीड, दि. 4 :- शासनामार्फत अभियांत्रिकी व औषधनिर्माण व फार्म
डी. अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा एमएचटी-सीईटी-2017 गुरुवार दि.11
मे 2017 रोजी सकाळी 9.30 ते 5 या वेळेत एकुण 29 उपकेंद्रावर 8 हजार 285 उमेदवारांची
परीक्षा बीड जिल्हा केंद्रावर घेण्यात येणार आहे. परीक्षेच्या कालावधीत कोणताही गैरप्रकार
होऊ नये यासाठी परीक्षा केंद्रावर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून परीक्षा केंद्राच्या
100 मीटर परिसरात फौजदारी प्रक्रीया संहितेचे 1973 चे कलम 144 अन्वये मनाई आदेश लागू
करण्यात आला आहे.
परीक्षेसाठी
बसलेल्या उमेदवारांना पेन, पाण्याची बाटली, लिखाणाचा पुठ्ठा (रायटींग पॅड) इत्यादी
साहित्य परीक्षा केंद्रावर आणण्यास परवानगी आहे. या व्यतिरिक्त पुस्तके, बॅगा, मोबाईल,
कॅल्क्युलेटर, लॉग टेबल इत्यादी साहित्य परीक्षा केंद्रावर घेवून जाता येणार नाही.
शासनाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे परीक्षेचे आवश्यक साहित्य उमेदवारांना जवळ बाळगण्याची
मुभा राहील. उमेदवारांनी परीक्षेच्या वेळी प्रवेशपत्रासोबत स्वत:चे आधारकार्ड, निवडणूक
आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट किंवा ड्रायव्हिंग लायसन्स (फक्त स्मार्ट कार्ड प्रकारचे)
यापैकी कोणतेही एक ओळखपत्र व त्याची एक छायांकित प्रत सोबत ठेवावी. उमेदवारांनी परीक्षा
केंद्रावर सकाळी 9 वाजेपूर्वी उपस्थित राहावे. परीक्षा सुरु झाल्यानंतर कोणत्याही सबबीखाली
प्रवेश देण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी. असे जिल्हाधिकारी,बीड यांनी कळविले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा