बीड,
दि. 11:- भाईचंद हिराचंद रायसोनी, मल्टीस्टेट को.ऑप.क्रे.सोसायटी लि.जळगावच्या माजलगाव
येथील शाखेमध्ये शेख तौफिक अब्दुल सत्तार रा.जुना बाजार रोड, माजलगाव यांनी व इतर
4 लोकांनी वेगवेगळ्या तारखेस ठेव स्वरुपात ठेवलेल्या एकुण 87, 50000 रुपयाचा यातील
आरोपीतांनी संगनमत करुन ठेवीदारांची वेळेत परतफेड न करता त्यांचा विश्वासघात करुन अपहार
केला असल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणी फिर्यादी शेख तौफिक अब्दुल सत्तार यांनी दि.7
फेब्रुवारी 2015 रोजी पोलीस ठाणे माजलगाव जि.बीड
येथे दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा रजिस्टर नंबर 1-14/15 कलम 406, 409, 34 भादवि
सह 3 एम.पी.आय.डी. ॲक्ट प्रमाणे गुन्हा करण्यात आलेला आहे. या गुन्ह्याचा तपास हा गुन्हे
अन्वेषण विभाग, औरंगाबाद यांच्यावतीने पोलीस निरीक्षक श्रीमती पी.टी.यादव या करीत आहेत.
तरी माजलगाव ग्रामीण भागातील किंवा इतर कोणत्याही
जिल्ह्यातील लोकांनी भाईचंद हिराचंद रायसोनी, मल्टीस्टेट को.ऑप,क्रे.सोसायटी माजलगाव
शाखा बीड यामध्ये पैसे गुंतविले असतील व ज्या लोकांनी अद्याप पर्यंत संपर्क साधला नाही
अशा लोकांनी गुन्हे अन्वेषण विभाग, पोलीस भवन बिल्डींग स्नेहनगर, औरंगाबाद येथे फोनवरुन
मो.नं.9923461277/9421564321 संपर्क करावा. असे पोलीस निरीक्षक गुन्हे अन्वेषण विभाग,
औरंगाबाद यांनी कळविले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा