गुरुवार, ११ मे, २०१७

पाटोदा येथील अनुसूचित जातीच्या मुलींच्या निवासी शाळेत प्रवेश सुरु




            बीड, दि. 11:- अनुसूचित जाती व नवबौध्द मुलींची शासकीय निवासी शाळा पाटोदा जि.बीड येथे दि.2 मे 2017 पासून शैक्षणिक वर्ष 2017-18 साठी इयत्ता 6 वीच्या वर्गाकरीता अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती, विमुक्त जमाती, विशेष मागास प्रवर्ग व अपंग प्रवर्गासाठी रिक्त असलेल्या जागेवर प्रवेश देणे सुरु असून या शाळेत सेमी इंग्रजी माध्यमातून शिक्षण दिले जाते. निवास, नाष्टा, भोजन तसेच नाईट ड्रेस, गणवेश, शैक्षणिक साहित्य व दैनंदिन गरजेचे साहित्य मोफत पुरविण्यात येते. तरी इच्छुक पालकांनी शालेय प्रशासनाशी संपर्क साधून आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करावा. असे मुख्याध्यापक, अनुसूचित जाती व नवबौध्द मुलींची शासकीय निवासी शाळा, पाटोदा जि.बीड यांनी कळविले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा