बीड, दि. 25 :- पंतप्रधान
श्री.नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीच्या माध्यमातून जनतेशी साधलेला संवाद मन कि बात या
कार्यक्रमाचा बत्तीसावा भाग रविवार दि.28 मे 2017 रोजी सकाळी 11 वाजता प्रसारीत केला
जाईल. त्यानंतर कार्यक्रमाचा मराठी अनुवाद प्रसारित करण्यात येईल. रात्री 8 वाजता मराठी
अनुवाद पुन: प्रसारीत होईल हे दोनही कार्यक्रम आकाशवाणी बीड अर्थात एफएम बँडच्या
102 पुर्णांक 9 दशांश मेगाहर्टसवरुन सर्व श्रोत्यांना ऐकता येतील. श्रोत्यांनी या कार्यक्रमाचा
लाभ घ्यावा आणि आपल्या प्रतिक्रीया airmankibaat@gmail.com या ई-मेलवर पाठवाव्यात.
असे बीड आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी यांनी कळविले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा