बीड, दि. 23 :-जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी
चंद्रकांत सुर्यवंशी, अपर जिल्हा दंडाधिकारी, बीड यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे
कलम 37 (1) (3) अन्वये मनाई आदेश लागू केला आहे. हा आदेश दि. 22 मे रोजीच्या रात्रीपासून
ते दि.5 जुन 2017 च्या रात्रीपर्यंत लागू राहील. या काळात शासकीय कर्तव्य बजावणाऱ्या
अधिकारी कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त अन्य कोणत्याही व्यक्तीस सार्वजनिक ठिकाणी शारीरिक इजा
होण्यास कारणीभूत ठरतील असे कोणतेही शस्त्र, वस्तू बाळगण्यास मनाई करण्यात आली असल्याचे
अपर जिल्हा दंडाधिकारी, बीड यांनी कळविले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा