शुक्रवार, २६ मे, २०१७

औषध विक्रेत्यांचा 30 मे रोजी लाक्षणिक संप अन्न व औषध प्रशासनाकडून पर्यायी व्यवस्था


            बीड, दि. 26 :- मंगळवार, दिनांक 30 मे 2017 रोजी अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटना व महाराष्ट्र केमिस्ट अँड ड्रगीस्ट असोसीएशन यांनी  देशातील सर्व किरकोळ व घाऊक औषध विक्रेते यांनी एक  दिवसाच्या लाक्षणिक संपाची घोषण केलेली आहे.
            सहाय्यक आयुक्त (औषधे) व औषध निरिक्षक अन्न व औषध प्रशासन, बीड यांनी महाराष्ट्र केमिस्ट अँड ड्रगीस्ट असोसीएशनच्या पदाधिकाऱ्यांशी बैठक घेऊन जनतेची व रुग्णांची गैरसोय टाळण्याकरीता दिनांक 30 मे 2017 रोजीचा बेकायदेशीर संप मागे घ्यावा तसेच जिल्ह्यातील औषधी विक्रेत्यांकडून जनसामान्यांच्या आरोग्यसेवेचे समाजोपयोगी  कार्य घडत आहे. अशा  प्रकारची सेवा जनसामान्यांपर्यंत पोहचविण्याचे कार्य औषधी   संघटनांकडून अविरतपणे सुरु रहावे. तरी दिनांक 30 मे 2017 रोजी नियमितपणे औषधी दुकाने सुरु ठेऊन आपण आंदोनलात  सहभागी होऊ नये  जेणेकरुन जनतेची गैरसोय  होणार नाही असे  आवाहन केलेले आहे.
            संपकाळात रुग्णांची गैरसोय होऊ नये  म्हणून  अन्न व औषध प्रशासनाच्यावतीने  बीडचे जिल्हा शल्य चिकीत्सक, अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता तसेच बीडचे जिल्हा आरोग्य अधिकारी यांना त्यांच्या अधिनस्त सर्व औषधी भांडारांमध्ये पुरेसा औषधी साठा उपलब्ध करुन ठेवण्यासाठी कळविले आहे. तसेच इंडियन मेडीकल असोसिएशन यांना देखील योग्य त्या उपाययोजना करुन ठेवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.
            याबाबत जनतेला आवाहन करण्यात येते की, जे नियमित औषधोपाचार घेत असतात त्यांनी दिनांक 30 मे 2017 पूर्वीच आवश्यक असलेल्या औषधींची खरेदी करावी. तसेच आपत्कालीन औषधाची आवश्यकता भासल्यास  नजीकच्या शासकीय / निमशासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा. तसेच जनतेला किंवा रुग्णांना औषधे उपलब्ध न झाल्यास अन्न व औषध प्रशासन बीड दुरध्वनी क्रमांक 02442-229236 किंवा औषध  निरिक्षक रा.बा. डोईफोडे मो.नं. 7578908105 वर संपर्क साधावा असे बीडच्या अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त वि.द. सुलोचने यांनी केले आहे.

-*-*-*-

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा