गुरुवार, १३ एप्रिल, २०१७

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शहरातील वाहतूक मार्गात बदल


       बीड, दि. 13 :- भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शहरातील विविध भागातून मिरवणूक निघून शिवाजी चौक येथून बशीरगंज-कारंजा-बलभीम चौक- डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास जाणार असून सुरक्षिततेच्या दृष्टीने शहरातील मार्गावरील वाहतूक सुरळी रहावी व नागरिकांची गैरसोय होवू नये या करीता जनतेच्या सोयीसाठी  वाहतूक मार्गात बदल केला आहे.
          सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्ग क्र.211 वरील मांजरसुंबा ते गढी जाणे व येण्यासाठी हा मार्ग जड, अवजड वाहनासाठी बंद करण्यात आला आहे. पर्यायी मार्ग म्हणून उस्मानाबादकडून येणारी वाहने मांजरसुंबा येथून नेकनूर, केज, धारुर, तेलगाव, माजलगाव, गढी मार्गे इच्छीत स्थळी जातील. तर औरंगाबाद, जालना व गेवराई कडून येणारी वाहने गढी मार्गे माजलगाव, तेलगांव, धारुर, केज, नेकनूर, मांजरसुंबा मार्गे असा पर्यायी मार्ग काढण्यात  आला आहे.           बीड शहरातील महामार्गावरील जय भवानी चौक ते शिवाजी पुतळा हा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनाच्या वाहतुकीसाठी बंद व नो पार्किंग करण्यात आला आहे. जय भवानी चौक, नवगण कॉलेज, लोकसेवा मंगल कार्यालयाजवळून यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, नगर नाका मार्गे पर्यायी रस्ता उपलब्ध केला आहे. बीड शहरातील महामार्गावरील मोंढा टी पाँईंट ते शिवाजी चौक हा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनाच्या वाहतुकीसाठी बंद व नो पार्किंग करण्यात आला आहे. रिलायन्स पेट्रोल पंप, अंबिका चौक, राजीव गांधी चौक, नगर नाका मार्ग पर्यायी रस्ता सुरु राहील तसेच मोंढा टी पॉईंट, जिजामाता चौक, सावता माळी चौक, आंबेडकर चौक मार्गेही वाहने इच्छित स्थळी जाण्यास पर्यायी मार्ग आहे.

          बीड शहरातील आंबेडकर चौक ते साठे चौक हा सुभाष रोड, चांदणी चौक, बलभीम चौक ते शिवाजी चौक, शिवाजी चौक ते नगर नाका पर्यंतचा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनाच्या वाहतूकीसाठी बंद व नो पार्किंग करण्यात आला आहे. फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका, पोलीस वाहने, कार्यक्रमानिमित्त येणाऱ्या महत्वाच्या व्यक्ती व अतिमहत्वाच्या व्यक्ती आणि इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना हा नियम लागू राहणार नाही. असे बीडचे पोलीस अधिक्षक जी.श्रीधर यांनी कळविले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा