बीड, दि. 13 :- महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा धोरणान्वये
जिल्हा क्रीडा पुरस्कार नियम 2012 अन्वये जिल्ह्यातील गुणवंत क्रीडापटू, क्रीडा मार्गदर्शक,
दोन क्रीडा कार्यकर्ता यांना प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह,
रोख 10 हजार रुपये प्रदान करुन गौरव करण्यात येतो. सन 2015-16 वर्षाकरीता पुरस्कारासाठी
प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. गुणवंत क्रीडा
मागदर्शक, गुणवंत क्रीडा कार्यकर्ता, एक महिला व एक पुरुष असे दोन गुणवंत खेळाडू पुरस्कारासाठी जिल्हा क्रीडा
कार्यालयामार्फत प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.
पुरस्कारासाठी
अर्ज करणाऱ्या अर्जदाराने जिल्ह्यात 15 वर्ष वास्तव असणे आवश्यक आहे. क्रीडा मार्गदर्शकाने
संबंधित जिल्ह्यामध्ये क्रीडा मार्गदर्शक म्हणून 10 वर्ष सतत मार्गदर्शनाचे कार्य केलेले
पाहीजे. त्याने वयाची 30 वर्ष पुर्ण करणे आवश्यक आहे.
क्रीडा
संघटक, कार्यकर्त्यांने सतत 10 वर्षे जिल्ह्यात क्रीडा विकासासाठी भरीव योगदान दिलेले
असावे, वयाची 30 वर्षे पुर्ण आवश्यक आहेत, खेळाडूंचे पुरस्कार वर्षासह लगतपूर्व 5 वर्षापैकी
2 वर्ष त्या जिल्ह्याचे मान्यता प्राप्त खेळाच्या अधिकृत वरिष्ठ, कनिष्ठ शालेय, ग्रामीण महिला राष्ट्रीय
क्रीडा स्पर्धामध्ये जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व केलेले असले पाहीजे.
परिपूर्ण अर्ज साक्षांकित कागदपत्रासह तीन पासपोर्ट फोटोसहजिल्हा
क्रीडा अधिकारी कार्यालय, बीड येथे कार्यालयीन वेळेत सादर करावेत. मुदतीनंतर आलेल्या
अर्जाचा विचार केला जाणार नाही. असे बीडचे जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी कळविले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा