बीड, दि. 12 :- महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय
व विशेष सहाय्य विभागामार्फत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह दि.8
ते 14 एप्रिल 2017 या कालावधीत साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहाअंतर्गत बीड समाज
कल्याणचे सहाय्यक आयुक्त आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या संयुक्त विद्यमाने गेवराई
तालुक्यातील पाडळसिंगी येथे आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले.
आरोग्य
शिबीर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पाडळसिंगी
येथील प्रतिष्ठित नागरिक मगन चव्हाण हे होते तर उदघाटन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त
आर.एम.शिंदे यांनी केले. नागरिकांनी सामाजिक न्याय विभागामार्फत आयोजित आरोग्य शिबीरामध्ये
बहुसंख्येने उपस्थित राहून मोफत आरोग्य तपासणीचा लाभ घ्यावा असे आवाहन सामाजिक कार्यकर्त्या
श्रीमती मनिषा तोकले यांनी केले. या शिबीरामध्ये आरोग्य विभागाचे डॉ.धनंजय माने, डॉ.कुलकर्णी
व त्यांच्या सहयोगी परिचारीका व वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी पाडळसिंगी येथील ग्रामस्थांची
मोफत आरोग्य तपासणी करुन त्यांना आरोग्यविषयक वैद्यकीय सल्ला व आवश्यक औषधी उपलब्ध
करुन दिली. या कार्यक्रमास गेवराई पंचायत समितीचे उपसभापती भिष्माचार्य दाभाडे, माजी
ग्रामपंचायत सदस्य शिवाजी दाभाडे, प्राचार्य राजेंद्र दाभाडे,माजी सरपंच राम भांडवलकर,
पोलीस पाटील महादेव चौधरी यांच्यासह समाज कल्याण विभागाचे अधिकारी-कर्मचारी मोठ्या
संख्येने उपस्थित होते. असे समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त यांनी कळविले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा