बुधवार, १२ एप्रिल, २०१७

पाटोदा पंचायत समिती येथे 20 एप्रिल रोजी आमसभा



          बीड, दि. 12 :-पंचायत समिती पाटोदाची आमसभा आमदार भिमराव धोंडे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवार दि.20 एप्रिल 2017 रोजी सकाळी 10 वाजता पंचायत समितीच्या प्रांगणात आयोजित करण्यात आली आहे.

          आमसभेकरीता आजी, माजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, उपसरपंच, सहकारी संस्थेचे पदाधिकारी, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, मुख्याध्यापक यांनी उपस्थित रहावे. असे पाटोदा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी कळविले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा