शनिवार, १ एप्रिल, २०१७

7 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा भ्रष्टाचार निर्मुलन समितीची बैठक




बीड, दि. 1 :- बीड जिल्ह्यातील शासकीय कर्मचाऱ्याविरुध्द प्रापत होणाऱ्या तक्रारीबाबत पाठपुरावा करण्यासाठी जिल्हा भ्रष्टाचार निर्मुलन समिती स्थापन करण्यात आली असून समितीची बैठक शुक्रवार दि.7 एप्रिल 2017 रोजी दुपारी 12 वाजता जिल्हाधिकारी यांच्या दालनात आयोजित करण्यात आली आहे. तरी जनतेने भ्रष्टाचारासंबंधी काही तक्रार असल्यास या समितीसमोर उपस्थित राहून पुराव्यासह लेखी स्वरुपात मांडाव्यात. असे जिल्हाधिकारी, बीड यांनी कळविले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा