शनिवार, १ एप्रिल, २०१७

बीड जिल्हा परिषद सभापतीपदी हांगे, दरेकर, देशमुख व पंडीत









बीड, दि. 1 :- बीड जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण सभापतीपदी संतोष हांगे, महिला बालकल्याण सभापतीपदी शोभा दरेकर तर दोन विषय समित्यांच्या सभापतीपदी राजेसाहेब देशमुख आणि युध्दजीत पंडीत यांची निवड झाली.
सभापती पदासाठीच्या निवडणूकीची प्रक्रीया आज डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाच्या सभागृहात पिठासीन अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी 60 पैकी 59 सदस्य उपस्थित राहून मतदानामध्ये सहभाग नोंदवला.
प्रारंभी सभापती पदाच्या निवडणूकीसाठी नामनिर्देशनपत्रे दाखल झाली. 4 पदासाठी 8 नामनिर्देशनपत्रे छाननीअंती वैध ठरली. प्रत्यक्ष हात उंचावून मतदानाची प्रक्रीया पार पाडण्यात आली. समाजकल्याण सभापतीपदाच्या निवडणूकीत संतोष हांगे यांना 34 तर प्रदीप मुंडे यांना 25 मते पडली. महिला व बालकल्याण सभापती पदाच्या निवडणूकीत श्रीमती केशरबाई घुमरे यांना 25 तर श्रीमती शोभा दरेकर यांना 34 मते पडली. तसेच दोन विषय समित्यांच्या सभापतीपदाच्या निवडणूकीत राजेसाहेब देशमुख यांना 35, चंद्रकांत शेजूळ यांना 24 तसेच युध्दजीत पंडीत यांना 34 तर बजरंग सोनवणे यांना 25 मते पडली.

यावेळी नवनियुक्त सभापतीचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून प्रशासनाच्यावतीने सत्कार करण्यात आला. निवडणूक प्रक्रीया पार पाडण्यासाठी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, तहसीलदार रामेश्वर गोरे, छाया पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी धनवंत माळी, नायब तहसीलदार शारदा दळवी, महाजन आदि अधिकारी कर्मचारी यांनी सहकार्य केले. यावेळी पाच पंचायत समित्यांचे सभापती उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा