बीड, दि. 1 :- सर्व
जिल्ह्यामध्ये एकसुत्रता येणे, लाभार्थ्यांना आर्थिक मदत लवकरात लवकर अदा करणे, शासनाच्या
धोरणानूसार कॅशलेस व्यवहार करण्यासाठी शनिवार दि.1 एप्रिल 2017 पासून ईलेक्टॉनिक्स
क्लिअरन्स सिस्टीमद्वारे आर्थिक मदत वाटप करण्याच्या सुचना आहेत. केंद्र, राज्य शासनाच्या
धोरणानूसार कॅशलेस भारत या योजनेअंतर्गत सर्व शासकीय कार्यालयामध्ये होणाऱ्या आर्थिक
बाबीची देवाण-घेवाण ही ईलेक्टॉनिक्स क्लिअरन्स सिस्टीमद्वारे करण्यात यावी अशी सुचना
असल्याने सर्व माजी सैनिकांनी कल्याणकारी, विशेष निधीतून आर्थिक मदत घेणेसाठी बँक ऑफ
महाराष्ट्र येथे खाते उघडून त्याची प्रत कल्याणकारी प्रकरणाबरोबर सादर करणे बंधनकारक राहील. असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी,
बीड यांनी कळविले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा