गुरुवार, २ मार्च, २०१७

बालकामगार प्रकल्पातील प्रशिक्षणार्थ्यांची लघु व्यवसायांना भेट





                   
          बीड, दि. 2 :- बालकामगार विशेष प्रशिक्षण केंद्रातील बालकांनी व्यवसाय प्रशिक्षणाच्या माध्यमातून विविध लघु उद्योगांना भेट देवून उद्योग चालविणाऱ्या मालकांना विविध प्रश्न विचारुन माहिती संपादित केली. यामध्ये लघु व्यवसायासाठी लागणारे साहित्य, प्रक्रीया व गुंतवणूक आणि त्यातून मिळणारे उत्पन्न याबाबत माहिती जाणून घेतली.

          राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प, बीड अंतर्गत बीड जिल्ह्यात23 बालकामगार विशेष प्रशिक्षण केंद्र कार्यरत असून त्यामध्ये 1 हजार 98 बालकामगार मुले विशेष प्रशिक्षण घेत आहेत. या बालकामगार विशेष प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेणाऱ्या मुलांना शिक्षण, आरोग्य तपासणी, विद्यावेतननाबरोबरच त्यांच्यातील विविध कौशल्याचा विकास व्हावा व त्यांनी 18 वर्षे वयाची पूर्ण केल्यानंतर मजूर न राहता कुशल कारागीर व्यावसायिक म्हणून काम करावे यासाठी प्रशिक्षण दिले जाते. यामध्ये टॉयमेकिंग, हँड एम्ब्रायडरी, मुर्ती कला, हस्तकला, विणकाम लोकरीपासून विविध वस्तु बनविणे, मायक्रॉनपासून वस्तु तयार करणे आदि प्रशिक्षण देवून बालकांच्या आवडीनूसार व वयोगटानूसार त्यांच्यातील कौशल्य विकासासाठी प्रयत्न केले जातात. असे बीडचे राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पाचे प्रकल्प संचालक यांनी कळविले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा