गुरुवार, २ मार्च, २०१७

महाशिवरात्रीनिमित्त परळी येथे बालकामगार प्रथा विरोधी जनजागृती



                   
          बीड, दि. 2 :- राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प, जिल्हाधिकारी कार्यालय, बीड अंतर्गत परळी येथे श्री वैद्यनाथ मंदिर परिसरात महाशिवरात्री उत्सवाचे औचित्य साधून परिसरातील तसेच राज्यातून दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना बालकामगार प्रथा विरोधी संदेश देण्यासाठी चित्ररथ, जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांचे जाहीर आवाहन व बालमजूरी प्रथा विरोधी संदेश देणाऱ्या विविध फलकाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली.

          जनजागृती कार्यक्रमाचे उदघाटन परळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री.बिक्कड यांनी केले. यावेळी प्रकल्प संचालक ओमप्रकाश गिरी, गणेश आवंतकर, शेख अफसर आदि उपस्थित होते. परळी परिसरात मोठ्या प्रमाणात विट भट्या व इतर उद्योग आहेत. त्यामध्ये पालकांसोबत आलेले स्थलांतरीत शाळाबाह्य मुलांचे प्रमाण असण्याची शक्यता असल्याने पालकांमध्ये जनजागृती  व्हावी, बालपणात काम केले तर बालकांच्या आरोग्यावर किती वाईट परिणाम होतात असा संदेश देणारे चित्ररुप बॅनर लावण्यात आले होते. जिल्हाधिकारी श्री.राम यांचे जाहीर आवाहन सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. या ठिकाणास सामाजिक कार्यकर्ते, पालक व शासकीय अधिकारी यांनी भेट दिली. असे बीडचे राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पाचे प्रकल्प संचालक यांनी कळविले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा