गुरुवार, २ मार्च, २०१७

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील स्क्रॅप साहित्य विक्रीसाठी निविदा सादर करावेत


                   
          बीड, दि. 2 :- बीड येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलींची) या संस्थेते निर्लेखित केलेली हत्यारे व उपकरणे तसेच स्क्रॅप साहित्याची विक्री निविदा पध्दतीने करावयाची असल्याने बुधवार दि.8 मार्च 2017 रोजी दुपारी 1 वाजेपर्यंत निविदा सादर करावेत.

          विक्री करावयाचे साहित्य दि.4 ते 8 मार्च 2017 या कालावधीत कार्यालयीन वेळेत पाहता येईल. इच्छुक खरेदीदारांनी प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलींची),बीड येथे संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी व निविदेच्या अटी व शर्तीबाबत माहिती संस्थेच्या भांडार विभागात पाहावयास मिळेल. असे बीड औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य यांनी कळविले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा