बुधवार, ८ मार्च, २०१७

जिल्हा महिला व बाल विकास विभागातर्फे जिल्हास्तरीय चाचा नेहरु बाल महोत्सव संपन्न



               बीड, दि.8 :- महिला व बाल विकास विभाग आणि जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, बीड यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यात बाल कल्याण क्षेत्रात कार्यरत असलेल्या शासकीय, स्वयंसेवी संस्थामध्ये पुनर्वसनासाठी दाखल झालेल्या अनाथ, निराधार, उन्मार्गी मुलांमधील सुप्त गुणांना वाव देऊन त्यांच्यात एकमेकांविषयी बंधुभाव, सांघीक भावना निर्माण होण्यासाठी जिल्हास्तरावरीय चाचा नेहरु बाल महोत्सव सन 2016-17 चे आयोजन करण्यात आले होते.
          कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर तर अध्यक्ष म्हणून विवेकानंद विद्यामंदिराचे मुख्याध्यापक ए.आर.जगताप यांची उपस्थिती होती. यावेळी बाल कल्याण समितीचे अध्यक्ष डी.एस.नलावडे, बाल विकास प्रकल्प अधिकारी श्री.मोरे, आर.डी.साखरे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी आर.डी.कुलकर्णी यांची उपस्थिती होती.
          जिल्हास्तरीय चाचा नेहरु बाल महोत्सवाचे उदघाटन भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन व दिपप्रज्वलनाने जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर यांनी केले. महोत्सावादरम्यान बीड जिल्ह्यात स्वयंसेवी संस्थाअंतर्गत कार्यरत असलेल्या बालगृहामध्ये बाल कल्याण समिती, बीड यांनी दाखल केलेल्या प्रवेशितांना सहभागी करुन घेण्यात आले. बाल महोत्सवात मैदानी विविध स्पर्धाचे (खेळांचे) आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेमध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवलेल्या प्रवेशितांना व सहभागी स्पर्धकांना बक्षीस सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देवून गौरव करण्यात आला.

          कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाचे परिविक्षा अधिकारी पी.डब्ल्यु. वंजारे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी जिल्हा परिविक्षा अधिकारी आर.एल.चौधरी, पी.डब्लयु.वंजारे, एस.एस. निर्मळ, एस.जे.सय्यद, एम.बी.जाधव, तत्वशील कांबळे, बी.एन.ढाकणे. जावेद टिनमेकर व कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, बीड यांनी कळविले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा