बीड, दि.7 :- महाराष्ट्र हरीत सेनेच्या प्रकल्पाच्या संकेतस्थळावर सदस्य नोंदणीचे
निर्देश प्राप्त झाले असून या योजनेत सदस्य विद्यार्थी, महिला, बचतगटाच्या महिला, विद्यार्थींनी,
नागरिक, शासकीय अधिकारी-कर्मचारी, संस्थेचे कर्मचारी, सेवानिवृत्त कर्मचारी, व्यापारी
वर्ग व इतर घटकांना योजनेचे सभासद होता येईल.
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जनतेने महाराष्ट्र
हरीत सेना, वन विभाग या प्रकल्पाचे जास्तीत जास्त सदस्य होवून योजनेचा सर्वांनी लाभ
घ्यावा. नोंदणीसाठी आधारकार्ड, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र, वाहन चालविण्याचे लायसन्स
इत्यादी पुराव्याची छायांकीत प्रत नजीकच्या वन विभागात देण्यात यावी व सदस्य व्हावे.
असे बीडचे विभागीय वन अधिकारी यांनी कळविले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा