शुक्रवार, ३ मार्च, २०१७

आशा कार्यकर्तींसाठीचे एचआयव्ही एडस प्रशिक्षण संपन्न


बीड, दि. 3 :- महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, मुंबई यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग जिल्हा रुग्णालय अंबाजोगाई येथील आशा कार्यकर्तीचे प्रशिक्षण नुकतेच संपन्न झाले.  या प्रशिक्षणाचा शुभारंभ उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल आनंत यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी                    डॉ. एल.एल.मोरे यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल आनंत म्हणाले की, ग्रामीण भागात काम करणाऱ्या आशा कार्यकर्तींचे काम अनमोल असून  त्या अत्यंत चांगल्या रितीने करीत आहेत. ग्रामीण भागातील प्रत्येक घरात आरोग्याविषयीची माहिती त्यांनी पोहचवावी असेही त्यांनी यावेळी सांगितले.
या प्रशिक्षणामध्ये डॉ. ए.एन.बगाटे, डॉ.अनुराधा यादव, सुहास कुलकर्णी, जिल्हा पर्यवेक्षक अनिल चव्हाण यांनी एचआयव्ही एडस बाबत समाजात असणारे समज, गैरसमज, प्रतिबंधात्मक उपाय, लैंगिक संबंधातून पसरणारे आजार, दुष्परिणाम व उपचार यांची सखोल माहिती आशा कार्यकर्ती यांना दिली.
डॉ. यादव यांनी सांगितले की, पीपीटीसीटी एम.डी.आर. औषधोपाचाराने एच.आय.व्ही. बाधीत गरोदर  मातेपासून जन्माला येणारे बाळ हे होणारे 95 टक्के एच.आय.व्ही. मुक्त असल्याचे सांगून सदरील औषधोपाचार एच.आय.व्ही. बाधीत गरोदर मातेला 14 आठवड्यातून चालु करण्यात येते. एकात्मिक सल्ला व तपासणी केंद्र येथे मोफत समुपदेशन केले जात असून जिल्ह्यात गरोदर मातांमध्ये एच.आय.व्ही. होण्याचे प्रमाण कमी होऊन ते प्रमाण 0.05 टक्के असल्याचे सांगून बाळाची कशा पध्दतीने देखभाल करावी, कोणती उपाययोजना करावी बाळाचा अठरा महिन्यापर्यंत पाठपुरावा करुन नियमित पीपीटीसीटी सेंटर मार्फत तपासण्या कराव्या लागतात. ईआयडी उपचार पध्दतीमध्ये एच.आय.व्ही. निगेटीव्ह बाळ जन्माला आल्याचे सांगून एच बाधीत नवदांपत्यांसाठी एक वरदान ठरल्याचे सांगितले. परंतु वैद्यकीय तपासण्या नियमित कराव्या लागतात. अशा कार्यकर्ती यांची एच.आय.व्ही. एड्स  प्रतिबंध कार्यक्रमात अत्यंत महत्वाची भूमिका असुन ग्रामीण भागातील प्रत्येक गरोदर मातेची एच.आय.व्ही. तपासणी करण्यासाठी प्रवृत्त करण्यावर भर देण्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन जिल्हा कार्यक्रम अधिकरी श्रीमती गंगावणे यांनी केले तर आभार धनराज पवार यांनी मानले. हे प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी सुहास कुलकर्णी, राजकुमार गवळे, सुकेशिनी गंडले, जीरे, श्रीमती काजी यांनी परिश्रम घेतले.

-*-*-*-

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा