बुधवार, १ मार्च, २०१७

लातूर परिमंडळात बीड जिल्हा रुग्णालयातील दंत विभाग अव्वल


                   
          बीड, दि. 1 :- लातूर आरोग्य परिमंडळामध्ये बीड, लातूर, उस्मानाबाद व नांदेड या चार जिल्ह्याचा समावेश होतो. जिल्ह्यातील सर्व जिल्हा रुग्णालय व अधिनस्त असलेले उपजिल्हा, स्त्री, ग्रामीण रुग्णालयाच्या तुलनेमध्ये जिल्हा रुग्णालय, बीड येथील दंत विभागाने सन 2016-2017 या वर्षात 33 हजार 528 रुग्णांना दंत विषयक आरोग्य सेवा उपलब्ध करुन दिल्याने अव्वल ठरला आहे.

          470 रुग्णांवर दंतनलिका, 254 रुग्णांवर दंत भरण, 790 रुग्णांवर दंत पर्यवेष्टन उपचार, 577 रुग्णांचे दंत उत्पाटन व 21 रुग्णांवर कृत्रीम दंतोपचार करण्यात आले आहेत. रुग्णांना यशस्वीपणे उपचार करण्यासाठी रुग्णालयाचे जेष्ठ दंत शल्य चिकित्सक डॉ.सत्येंद्र दबडगावकर यांच्या नेतृत्वाखाली दंत विभागातील डॉ.सबा सय्यद, गंगाधर वाहुळ, श्रीमती सिमा पाटिल, श्रीकांत उजगरे, श्रीमती सुशीला नखाते यांनी परिश्रम घेतले. रुग्णालयातील दंत विभागाचे काम जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एन.एस.चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे. दंत विभगामार्फत भविष्यात "स्वच्छ मुख अभियान" अंतर्गत सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचा अवलंब करुन विभागामार्फत कार्यरत असलेल्या सर्व अधिकारी व आरोग्य कर्मचारी यांची मौखिक आरोग्य तपासणी चालु आहे तसेच निरंतर दंत प्रशिक्षण मार्गदर्शन शिबीरे बीड जिल्ह्यात विविध ठिकाणी राबविण्यात येत आहेत. बीड शहरातील विविध शाळेमध्ये योग्य ब्रशींग पध्दतीचा अवलंब शिबीराचे देखील आयोजन करण्यात आलेले आहे. असे बीडचे जिल्हा शल्य चिकित्सक यांनी कळविले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा