बुधवार, १ मार्च, २०१७

राष्ट्रीय युवा कोर योजनेतर्गत राष्ट्रीय स्वयंसेवक पदासाठी अर्ज करावेत


          बीड, दि. 1 :- केंद्र शासनाच्या राष्ट्रीय युवा कोर योजनेमध्ये सहभागी होऊन युवा संगठन तथा युवा नेतृत्वाद्वारे राष्ट्र विकास व राष्ट्र बांधणीमध्ये सहभागी होण्याकरीता भारत सरकार द्वारा आरोग्य, साक्षरता, सार्वजनिक स्वच्छता, पर्यावरण, सामाजि‍क क्षेत्रात जनजागृती, शासकीय अभियान इत्यादी स्वरुपाच्या कार्यात सहभाग तथा प्रसंगी आयोजन करण्याकरीता बीड जिल्ह्यातील युवक-युवतीकडून राष्ट्रीय स्वयंसेवक पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.

          उमेदवार किमान दहावी पास असावा. वय 18 ते 29 वर्षादरम्यान असावे, सध्यस्थितीत शिक्षण घेत असणाऱ्यांनी अर्ज करु नये.         प्रत्येक तालुक्यासाठी 2 पदे असून तालुक्यातील रहिवासी उमेदवारांनी पुराव्यासह अर्ज करावेत. उमेदवारांना प्रतिमाहे 5 हजार रुपये मानधन देण्यात येईल. अर्जाच्या नमुन्यासाठी नेहरु युवा केंद्र संगठनच्या www.nyks.org या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरुन प्रत किंवा आवश्यक कागदपत्रासह अर्ज नेहरु युवा केंद्र, बीड येथे दि.6 मार्च 2017 पूर्वी सादर करावा. असे बीडचे नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक यांनी कळविले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा