बुधवार, १ फेब्रुवारी, २०१७

स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण घेवून स्वत:चा उद्योग निर्माण करा - पोलीस उपअधिक्षक गणेश गावडे




बीड, दि. 1 :- स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण घेवून स्वत:चा उद्योग निर्माण करा व आपल्यातील कुमकुवत बाजू आपली शक्ती बनवा असे आवाहन पोलीस उपअधिक्षक गणेश गावडे यांनी ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था, बीड येथील आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना केले.
स्टेट बँक ऑफ हैद्राबाद ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था, बीड येथे एलएमव्ही ड्रायव्हिंग व कॉम्प्युटर बेसिक प्रशिक्षणाचे आयोजन दि.2 ते 31 जानेवारी 2017 या कालावधीत करण्यात आले होते. या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या प्रमाणपत्र वितरण प्रसंगी श्री.गावडे बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, मार्केटिंग करत असताना आपल्यातील कौशल्य विकसीत करा, आपल्यातील उणीवा आहेत त्याचीच शक्ती बनवा, स्वत:ला कमी लेखू नका नौकरी सर्वांनाच मिळणार नाही परंतू  रोजगार सर्वांना मिळू शकतो त्यासाठी तरुणांनी खचून न जाता उद्योग व्यवसायाकडे वळावे व आपले भविष्य उज्वल करावे असेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेचे संचालक एम.पी. वाघमारे, ड्रायव्हिंग स्कुलचे प्रशिक्षक श्री.वैष्णव, कॉम्प्युटरचे प्रशिक्षक सय्यद चाँद आदि उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शरद पाटोळे तर प्रास्ताविक सुरेश बोचकुरे यांनी केले. या कार्यक्रमास प्रशिक्षार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. असे बीडचे ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेचे संचालक यांनी कळविले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा