बीड, दि.
2 :- शिक्षण हक्क अधिनियम 2009 आणि बालकाचा
मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क कायद्यानुसार वंचित व दुर्बल घटकातील बालकांना प्राथमिक
शिक्षणासाठी प्रवेश देण्याकरीता 25 टक्के राखीव जागेसाठी ऑनलाईन प्रक्रिया गुरुवार दि. 26 जानेवारी ते 11 मार्च 2017 पर्यंत
राबविण्यात येत आहे. संबंधित घटकांनी ऑनलाईन
प्रवेश प्रक्रिया प्रभावीपणे राबवावी असे आवाहन बीड जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी
(प्रा), यांनी केले आहे.
ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया शाळा नोंदणी दि.
16 जानेवारी ते 3 फेब्रुवारी 2017, पालकांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरणे दि.5 फेब्रुवारी
ते 21 फेब्रुवारी 2017, पहिली लॉटरी काढणे 27 व 28 फेब्रुवारी 2017, पालकांनी शाळेत
जाऊन प्रवेश घेणे दि. 1 ते 9 मार्च 2017, विहीत मुदतीनंतर रिक्त पदाची माहिती तपासुन
शाळांनी उर्वरीत रिक्त जागा दर्शविणे दि. 10 ते 11 मार्च 2017 असा ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचा
कालावधी राहणार आहे.
पहिल्या सोडतीतील प्रवेशप्रक्रिया पार
पाडल्यानंतर ऑनलाईन अर्ज भरणा-या उर्वरीत विद्यार्थ्यांकरीता 10 मार्च ते 29 एप्रिल 2017 पर्यंत 4 सोडती काढण्यात
येणार आहेत. शाळा नोंदणीनंतर पालकांना https://student.maharashtra.gov.in/adm portal/Users/rteindex
या संकेतस्थळावर सर्व माहिती उपलब्ध करुन देण्यात आली आहे. 25 टक्के निकषपात्र शाळांनी
ऑनलाईन शाळा नोंदणी करणे कायद्यानुसार बंधनकारक आहे. ज्या शाळा नोंदणी करणार नाहीत
त्यांची मान्यता रद्द करण्यात येणार आहे. यावर्षी
ऑनलाईन अर्ज भरतांना कोणतेही कागदपत्र स्कॅन करुन अपलोड करण्याची गरज नाही. संबंधित विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रीयेत निवड
झाल्यावर प्रवेशाच्या वेळी प्रत्यक्ष सर्व दस्ताऐवज तपासुन प्रवेश दिला जाणार आहे.
ऑनलाईन प्रक्रियेच्या प्रभावी अंमलबजावीसाठी सर्व गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी,
डाटा एन्ट्री ऑपरेटर आणि संबंधित 25 टक्के प्रवेश पात्र शाळांचे मुख्याध्यापक यांची
कार्यशाळा शनिवार दि.4 फेब्रुवारी 2017 रोजी स्काऊट भवन, बीड येथे आयोजित करण्यात आहे.
असे बीड जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (प्रा) यांनी कळविले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा