बीड, दि.
1 :- मुंबई येथील कांदीवली (पूर्व) भारतीय खेळ प्राधिकरण प्रशिक्षण केंद्राच्या वतीने
ॲथलेटीक्स, बॉक्सींग, ज्युदो, कुस्ती, हॉकी, कबड्डी, टेबल टेनिस आणि आर्चरी या खेळांसाठी
दि.26 ते 28 फेब्रुवारी 2017 या कालावधीत सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत निवासी व
अनिवासी प्रशिक्षण 12 ते 16 वयोगटातील खेळाडूंची त्यांची खेळातील कामगिरी पाहून निवड
केली जाणार आहे.
निवड झालेल्या पात्र खेळाडूंना
भारतीय खेळ प्राधिकरणाच्या वतीने निवास, भोजन आणि प्रशिक्षणाची तसेच शिक्षणाची विनामुल्य
सुविधा उपलब्ध करुन दिली जाईल. या योजनेचा मुख्य उद्देश लहान वयातच गुणवंत खेळाडूंची
निवड करुन देशासाठी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय
दर्जाचे खेळाडू तयार व्हावेत असा आहे. बीड जिल्ह्यातील 12 ते 16 वर्षे वयोगटातील खेळाडूंनी
दि.26 ते 28 फेब्रुवारीला कांदीवली पूर्व मुंबई येथे उपस्थित रहावे. अधिक माहितीसाठी
जिल्हा क्रीडा कार्यालयाशी संपर्क साधावा. असे बीडचे जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी कळविले
आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा