सोमवार, २ जानेवारी, २०१७

डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेसाठी प्रस्ताव सादर करावेत



बीड, दि. 2 :- महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभाग मंत्रालय, मुंबई यांच्या दि.30 डिसेंबर 2016 रोजीच्या पत्राद्वारे शासनाकडून सन 2016-17 मध्ये डॉ.झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना राबविण्यात येणार असून त्या अनुषंगाने बीड जिल्ह्यातील सन 2016-17 मध्ये अनुदान मिळवू इच्छिणाऱ्या मदरसा संचालकांनी दि.11 ऑक्टोबर 2016 रोजीच्या शासन निर्णयाप्रमाणे सविस्तर प्रस्ताव दि.25 जानेवारी 2017 पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय, बीड येथे सादर करावेत. असे बीडचे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा