मंगळवार, ३ जानेवारी, २०१७

जिल्हाधिकारी कार्यालयात सावित्रीबाई फुले यांना अभिवादन



                   बीड, दि. 3 :- जिल्हाधिकारी कार्यालयात सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अपर जिल्हाधिकारी अनिल पवार यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

          यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, उपविभागीय अधिकारी विकास माने, शिवकुमार स्वामी, नायब तहसीलदार श्रीमती शारदा दळवी, ए.एम.शेख, सय्यद कलीम यांनीही  सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी,  कर्मचारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा