बीड, दि.2 :- अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने
एनसीडीईएक्स-ई मार्केटस् लिमिटेड मार्फत ई-लिलावाद्वारे बीड जिल्ह्यासाठी माहे जानेवारी
2017 साठी 6 हजार 70 क्विंटल साखरेचे नियतन मंजूर केलेले असून साखर वाहतूक पुरवठादार
म्हणून मे राज ट्रेडर्स चौसाळा जि.बीड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मे राज
ट्रेडर्स चौसाळा यांच्यामार्फत बीड जिल्ह्यातील सर्व तालुक्याच्या ठिकाणाचे शासकीय
धान्य गोदामात साखर पुरवठा करण्यात येणार आहे.
त्या अनुषंगाने माहे जानेवारी 2017 साठी 6 हजार 70 क्विंटल मंजूर असलेले साखर नियतन
जिल्ह्यातील सर्व तालुक्यासाठी पुढीलप्रमाणे मंजूर करण्यात येत आहे. बीड 1180.50, गेवराई
965, माजलगाव 303, वडवणी(चिंचवण) 248, धारुर 370, अंबाजोगाई 445, केज 751, परळी वैजनाथ
619.50, पाटोदा 337, आष्टी 470, शिरुर कासार 381 क्विंटल याप्रमाणे तालुक्यांना साखर
नियतन पोहोचविण्यात येत आहे. याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी असे जिल्हाधिकारी,बीड
यांनी आदेशात नमूद केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा