बीड,
दि. 12 :- ई-स्कॉलरशिप प्रणालीद्वारे भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क व परीक्षा
शुल्क योजनेअंतर्गत बीड जिल्ह्यातील सन 2016-2017 या शैक्षणिक वर्षातील महाविद्यालय
स्तरावर असलेले नवीन व नुतनीकरण केलेले आवेदनपत्र निकाली काढण्या संदर्भात दि.18 ते
25 जानेवारी 2017 या कालावधीत विशेष कँम्पचे आयोजन करण्यात आले आहे.
कॅम्पमध्ये भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण
फी, परीक्षा फी चे नवीन प्रवेशित (प्रथम वर्ष) विद्यार्थ्यांच्या आवेदनपत्रासोबत सर्व
आवश्यक कागदपत्रे, विद्यार्थ्यांचे बँक खात्याशी आधारकार्ड लिंक केलेली पावती बंधनकारक
आहे. कॅंम्पला येताना महाविद्यालयांचे संलग्नीकरण, फिस मान्यता, स्टेटमेंट बी रिपोर्ट,
विद्यार्थ्यांची विद्यापीठाने, उच्च तंत्र संचालनालयाने मान्यता दिलेली यादी इत्यादी
कागदपत्रे आणावेत.
बीड व वडवणी तालुक्यासाठी दि.18 व 19 जानेवारी
2017 रोजी आदित्य अभियांत्रिकी महाविद्यालय,बीड येथे कॅंम्पचे आयोजन करण्यात आले आहे.
परळी व केज तालुक्यासाठी शुक्रवार दि.20 जानेवारी 2017 रोजी आदित्य अभियांत्रिकी महाविद्यालय,बीड
येथे कॅंम्पचे आयोजन करण्यात आले आहे. अंबाजोगाई तालुक्यासाठी शनिवार दि.21 जानेवारी
2017 रोजी आदित्य अभियांत्रिकी महाविद्यालय,बीड येथे कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे.
पाटोदा व धारुर तालुक्यासाठी सोमवार दि.23 जानेवारी 2017 रोजी आदित्य अभियांत्रिकी
महाविद्यालय,बीड येथे कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. शिरुर व आष्टी तालुक्यासाठी मंगळवार
दि.24 जानेवारी 2017 रोजी आदित्य अभियांत्रिकी महाविद्यालय,बीड येथे कॅम्पचे आयोजन
करण्यात आले आहे. गेवराई व माजलगाव तालुक्यासाठी बुधवार दि.25 जानेवारी 2017 रोजी आदित्य
अभियांत्रिकी महाविद्यालय,बीड येथे कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. कँम्पमध्ये सन
2015-2016 तसेच सन 2016-2017 चे बी-स्टेटमेंट तपासणीसाठी उपलब्ध करुन देणे अनिवार्य
आहे याची सर्व महाविद्यालयातील प्राचार्यांनी नोंद घ्यावी. अधिक माहितीसाठी समाज कल्याण
कार्यालय,बीड यांच्याशी संपर्क साधावा. असे समाज कल्याण बीडचे सहाय्यक आयुक्त यांनी
कळविले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा