गुरुवार, १२ जानेवारी, २०१७

जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-2017 गटनिहाय व गणनिहाय प्रभागनिहाय प्रारुप मतदार यादी संकेतस्थळावर प्रसिध्द




            बीड, दि. 12 :- मा.राज्य निवडणूक आयोग महाराष्ट यांचे दि.22.11.2016 च्या आदेशान्वये जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-2017 साठी राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशप्रमाणे गुरुवार दि.12 जानेवारी 2017 रोजी गटनिहाय व गणनिहाय प्रारुप मतदार यादी जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद कार्यालयाच्या संकेतस्थळावर तसेच सर्व तहसील कार्यालयात अवलोकनासाठी प्रसिध्द करण्यात आली आहे. या प्रारुप मतदार यादीवर दि.12 ते 17 जानेवारी या कालावधीत संबंधित तहसीलदार यांच्याकडे आक्षेप घेवून दुरुस्ती सुचविता येईल. असे जिल्हाधिकारी, बीड यांनी कळविले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा