सोमवार, २ जानेवारी, २०१७

पालकमंत्री श्रीमती पंकजा मुंडे यांचा बीड जिल्हा दौरा कार्यक्रम



बीड, दि. 2 :- राज्याच्या ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती पंकजा मुंडे या बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

मंगळवार दि.3 जानेवारी 2017 रोजी मुंबई येथून हेलिकॉप्टरने पोलीस परेड ग्राउंड बीड येथे दुपारी 2.45 वाजता आगमन. दुपारी 3 वाजता जिल्हा नियोजन समिती बैठकीस उपस्थिती. सायंकाळी 5 वाजता पोलीस परेड ग्राऊंड येथील हेलिपॅडवरुन ता.अंबाजोगाईकडे प्रयाण. सायंकाळी 5.30 वाजता स्वामी रामानंद तिर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय अंबाजोगाई येथील हेलिपॅडवर आगमन. सायंकाळी 6 वाजता वाहनाने मौजे धानोरा ता.अंबाजोगाई येथे आगमन व विविध विकास कामांचा शुभारंभास उपस्थिती. रात्री 7 वाजता वाहनाने मौजे राडी ता.अंबाजोगाई येथे आगमन व विविध विकास कामांचा शुभारंभास उपस्थिती. रात्री 8 वाजता वाहनाने मौजे मुडेगाव ता.अंबाजोगाई येथे आगमन  व विविध विकास कामांचा शुभारंभास उपस्थिती. रात्री 9 वाजता वाहनाने मौजे बर्दापूर ता.अंबाजोगाई येथे आगमन व विविध विकास कामांच्या शुभारंभास उपस्थिती. रात्री 10 वाजता वाहनाने परळी निवासस्थानाकडे प्रयाण. रात्री 22.45 वाजता परळी निवासस्थानी आगमन व मुक्काम.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा