शुक्रवार, १३ जानेवारी, २०१७

जिल्हा‍ एड्स प्रतिबंध व नियंत्रण समितीची बैठक संपन्न



            बीड, दि. 13 :- जिल्हा एडस प्रतिबंध व नियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली. यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी जिल्हा एड्स प्रतिबंध समितीमार्फत जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या कामाचा आढावा जाणून घेवून योग्य त्या सुचना केल्या तसेच ग्रामीण व शहरी भागात जनजागृती करण्यास भर देण्याची सूचनाही त्यांनी यावेळी केली. तसेच एचआयव्ही बाधीत रुग्णाला शासनाच्या योजना मिळवून देण्यासाठी डापकू कार्यालयामार्फत पाठपुरावा करण्यात येत आहे. लाभार्थ्यांना संजय गांधी योजना, बालसंगोपन योजनेचा फायदा मिळवून देण्यासाठी सर्वस्तरावर मदत केल्या जाईल यासाठी डापकु विभागामार्फत प्रस्ताव दाखल करण्याचे आदेश देण्यात आले.

            बैठकीमध्ये जिल्ह्यात डापकु अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या एचआयव्ही, एड्स, टीबी, एआरटी, ब्लडबँक, अशासकीय संस्था अंतर्गत झालेल्या कार्यक्रमाचा आढावा जिल्हा कार्यक्रम अधिकारी साधना गंगावणे यांनी सादर केला. राष्ट्रीय युवा दिनानिमित्त 12 ते 26 जानेवारी या कालावधीत जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमाचे नियोजन सादर करण्यात आले. महाविद्यालयातील युवक व युवतीसाठी चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, रक्तदान शिबीर, प्रभात फेरी, मानवी साखळी तसेच आयईसी वाटप करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. या बैठकीस आरोग्य विभागाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा