बीड, दि.11 :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत
स्टेट बॅक ऑफ हैद्राबादच्या ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था, बीडच्या वतीने पोलीस
अधिक्षक कार्यालयाजवळील पोलीस वसाहतीत स्वच्छता कार्यक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमाचे
उदघाटन पोलीस निरीक्षक श्री.रोडगे यांनी केले. यावेळी संस्थेचे संचालक एम.पी.वाघमारे
यांची प्रमुख उपस्थिती होती.
ग्रामीण विकास मंत्रालय भारत सरकारच्या
अंतर्गत ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या वतीने बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील
सुशिक्षीत बेरोजगार तरुणांना विविध व्यवसायाचे मोफत प्रशिक्षण दिले जाते. यावेळी एलएमव्ही
ड्रायव्हिंग तसेच बेसिक कॉम्प्युटर या दोन प्रशिक्षणाचे वर्ग प्रशिक्षण केंद्रात सुरु
असून या दोन प्रशिक्षणातील एकुण 60 प्रशिक्षणार्थीद्वारे स्वच्छता अभियान राबविण्यात
आले. यामध्ये पोलीस वसाहतीतील अस्वच्छ परिसर स्वच्छ करण्यात आला. यावेळी संस्थेचे अधिकारी-कर्मचारी
यांच्यासह प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा