बीड, दि.10:- संपूर्ण देशपातळीवर राष्ट्रीय
लोकअदालतीचे शनिवार दि.11 फेब्रुवारी 2017 रोजी आयोजन करण्यात आले आहे. सर्व दिवाणी
व फौजदारी तसेच मोटार अपघात, भूसंपादन, कौटूंबिक प्रकरणे, बँकाची प्रकरणे, दाखलपूर्व
प्रकरणे या महालोक अदालतीमध्ये ठेवण्यात येणार असून पक्षकारांनी जास्तीत जास्त प्रकरणे
तडजोडीने मिटवून न्यायालयीन प्रक्रियेतील वेळ व पैसा वाचवावा असे आवाहन जिल्हा विधीसेवा
प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, बीड यांनी केले आहे.
लोक न्यायालय हे सशक्त माध्यम आहे. लोकन्यायालयाची
चळवळ समाजामध्ये आता सर्वत्र रुजलेली आहे व त्याचे महत्व पक्षकारांना माहित आहे याची
प्रचिती येऊ लागलेली आहे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा वकील संघ यांच्या संयुक्त
विद्यमाने दि.11 फेब्रुवारी 2017 रोजी बीड जिल्हा न्यायालयात व सर्व तालुका न्यायालयात
राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले असून या लोकअदालतीचा जास्तीत जास्त पक्षकारांनी
फायदा घ्यावा. यामध्ये जास्तीची प्रकरणे निकाली काढल्यास विलंब कमी होऊन समज गैरसमज
निश्चित दूर होतील. या लोकअदालतीमध्ये पक्षकारांनी उत्साहाने उपस्थित राहून प्रकरण
तडजोडीने मिटविण्याचे प्रयत्न करावेत ज्यामुळे एका चांगल्या नात्याची सुरुवात होईल.
तरी या राष्ट्रीय लोकअदालतीचा बीड जिल्ह्यातील जास्तीत जास्त पक्षकारांनी लाभ घ्यावा.
असे जिल्हा विधीसेवा प्राधिकरण बीडचे अधिक्षक यांनी कळविले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा