बुधवार, ११ जानेवारी, २०१७

मुस्लिम, ख्रिश्चन,शीख,बौध्द,पारसी,जैन व ज्यु लोकसमुहांना अल्पसंख्याक दर्जा



  बीड, दि.11 :- शासन राजपत्रानूसार राज्यातील लोकसमुहापैकी मुस्लिम, ख्रिश्चन,शीख,बौध्द,झोराष्ट्रीयन(पारसी) व जैन आणि ज्यु या  एकुण 7 लोकसमुहांना ''अल्पसंख्याक लोकसमूह '' म्हणून घोषित केले आहेत.

            राज्यातील उपरोक्त 7 लोकसमुहांना ''अल्पसंख्याक लोकसमूह '' असा दर्जा असल्याची पुरेशी माहिती सर्व संबंधित लोकसमुहातील जनतेला व त्यांच्यासाठी योजना राबविणाऱ्या प्रशासकीय यंत्रणांना देखील नाही यामुळे अल्पसंख्याकांसाठी केंद्र शासन व राज्य शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजना या लोकसमुहापर्यंत पोहचण्यास अडचण येत आहे. सर्व प्रशासकीय विभागांनी राज्यातील लोकसमुहापैकी 1)मुस्लिम, 2)ख्रिश्चन, 3)शीख, 4)बौध्द, 5) झोराष्ट्रीयन (पारसी), 6) जैन, 7) ज्यु  या लोकसमुहांना शासनाने अल्पसंख्याक लोकसमुह म्हणून दर्जा दिला असल्याची बाब लक्षात घेवून योजनांची आखणी करण्यात यावी व अल्पसंख्याक लोकसमुहांना त्याचा लाभ होईल याची दक्षता घ्यावी. असे जिल्हाधिकारी, बीड यांनी कळविले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा