सोमवार, ९ जानेवारी, २०१७

औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ
द्विवार्षिक निवडणूकीची सुचना जाहिर
           
            बीड - भारत निवडणूक आयोगाने 5- औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघातून महाराष्ट्र विधान परिषदेची द्विवार्षिक निवडणूक-2017 जाहिर केली असून निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त औरंगाबाद यांनी निवडणूकीची सुचना जारी केली आहे.

            5-औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघातून  एका सदस्याची महाराष्ट्र विधान परिषदेसाठी निवडणूक घ्यावयाची असल्याने निवडणूक घ्यावयाची आहे. नामनिर्देशनपत्रे उमेदवारांना किंवा त्यांच्या कोणत्याही सुचकास विभागीय आयुक्त औरंगाबाद तथा निवडणूक निर्णय अधिकारी, 5-औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ किंवा उपआयुक्त (सामान्य प्रशासन) विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, 5- औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ यांच्याकडे मंगळवार दि.17 जानेवारी 2017 पर्यंत कोणत्याही दिवशी (सार्वजनिक सुट्टी व्यतिरिक्त) सकाळी 11 ते 3 वाजेपर्यंत विभागीय आयुक्त औरंगाबाद यांच्या कार्यालयात दाखल करता येतील तसेच याच ठिकाणी नामनिर्देशनपत्र वेळेत मिळू शकतील. नामनिर्देशनपत्रांची छाननी बुधवार दि.18 जानेवारी 2017 रोजी सकाळी 11 वाजता विभागीय आयुक्त कार्यालय, औरंगाबाद येथे करण्यात येईल. उमेदवारी मागे घेण्याबाबतची सूचना उमेदवाराला, त्यांचे सुचकाला किंवा त्यांच्या निवडणूक प्रतिनिधीला (ज्यांना उमेदवाराने उमेदवारी मागे घेण्याबाबतची सुचना देण्याबाबत लेखी प्राधिकार दिला आहे.) वरील परिच्छेद (2) मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या कोणत्याही अधिकाऱ्यास त्यांच्या कार्यालयात शुक्रवार दि.20 जानेवारी 2017  रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत दाखल करता येतील. निवडणूक लढविली गेल्यास शुक्रवार दि.3 फेब्रुवारी 2017 रोजी सकाळी 8 ते 4 या कालावधीत मतदान घेण्यात येईल. असेही निवडणूक सुचनेत नमुद करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा