सोमवार, ९ जानेवारी, २०१७

जिल्हाधिकाऱ्यांकडून रस्त्याची पाहणी 10 जानेवारीपासून बिंदुसरा नदीजवळील पर्यायी रस्ता वाहतुकीसाठी खुला होणार



            बीड, दि. 9 :-  बीड शहरातून जाणाऱ्या बिंदुसरा नदीच्या पुलावरील अवजड वाहनांची वाहतुक पावसाळयामध्ये सुरक्षिततेचा उपाय म्हणून बंद करण्यात आला होती. त्यामुळे शहरातून जाणाऱ्या अवजड वाहनांना बऱ्याच अंतरावरुन जालना रोड किंवा बार्शी रोड मार्गे जावे लागत होते. ही अडचण लक्षात घेऊन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी राष्ट्रीय महामार्ग विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि आय.आर.बी. इन्फ्रास्ट्रक्चर यांच्या अधिकाऱ्यांशी वेळोवेळी बैठका घेऊन बार्शी रस्त्यावरील पुलाच्या समांतर पर्यायी रस्त्याचे काम तातडीने पुर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. या पर्यायी रस्त्याचे काम पूर्ण झाले असून  या रस्त्याची जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.
बार्शी नाक्यावरुन येताना जड वाहनांनी उजव्या बाजूच्या पर्यायी रस्त्याचा वापर करावा लागणार असून ही वाहने शहरात दाखल होऊ शकणार आहेत. यावेळी जिल्हाधिकारी राम यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना या पर्यायी रस्त्यावरील विद्युत व्यवस्था, वाहतुक नियमन आणि संबंधित उपायोजनांचीही कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.

            यावेळी राष्ट्रीय महामार्गचे प्रोजेक्ट डायरेक्टर श्री. चामरगोरे, श्री. घोटकर, आय.आर.बी. इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे       श्री. श्रीवास्तव, श्री. चौरे, अनिल दंडे, विजय कुयरे, अविनाश वानखेडे यांनी उपस्थिती होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा