बीड, दि. 9 :- दरवर्षी 12 जानेवारी हा दिवस स्वामी विवेकानंद
यांचा जन्मदिन म्हणून साजरा करण्यात येतो. तसेच 12 ते 19 जानेवारी या कालावधीत राज्यात
युवा सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत 12 ते
19 जानेवारी 2017 या कालावधीत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
गुरुवार
दि.12 जानेवारी रोजी सकाळी 12 वाजता केएसपी विद्यालय येथे युवा दिन व युवा सप्ताहाचे
मान्यवरांच्या उपस्थितीत उदघाटन होईल. शुक्रवार दि.13 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजता
शरदचंद्र विद्यामंदिर बीड येथे देशभक्तीपर समुह गायन स्पर्धा घेण्यात येईल. शनिवार
दि.14 जानेवारी रोजी सकाळी राजर्षि शाहू महाराज प्रतिष्ठाण कार्यालय, धानोरा रोड,बीड
येथे विवेकानंदाचे कार्य या विषयावार 21 वर्षाआतील मुले-मुलींसाठी निबंध स्पर्धा होईल.
रविवार दि.15 जानेवारी दुपारी 12 वाजता बीड येथील जिल्हा परिषद कन्या शाळेत बेसबॉल
खेळाचे प्रदर्शनिय सामने होतील. सोमवार दि.16 जानेवारी रोजी प्रत्येकाने आपला परिसर
स्वच्छ कसा ठेवावा हा कार्यक्रम होईल. मंगळवार दि.17 जानेवारी रोजी सकाळी 12 वाजता
जिल्हा क्रीडा संकुलातील हॉलमध्ये देशामध्ये शांतता राखण्यात युवकांची कर्तव्य या विषयावर
चर्चासत्र, बुधवार दि.18 जानेवारी रोजी सकाळी 12 वाजता कैलास कला निकेतन चित्रकला महाविद्यालयात
चित्रकला प्रदर्शन होईल. दि.19 जानेवारी रोजी दुपारी 2 वाजता जिल्हा क्रीडा संकुलातील
हॉलमध्ये सप्ताहाचा समारोप करण्यात येईल. सर्व कार्यक्रम बीड शहरातील विविध ठिकाणी
आयोजित करण्यात आली आहेत.
कार्यक्रमात
सहभागी होण्यासाठी व माहितीसाठी सप्ताहाचे उदघाटनाकरीता डी.यु.वाघमारे (भ्र.9423762828),
देशभक्तीपर समुहगायन स्पर्धेकरीता प्रमोद गायकवाड (भ्र.9420411778), निबंध व चर्चासत्राकरीता स्पर्धेकरीता तत्वशील कांबळे
(भ्र.9423470437), बेसबॉल प्रदर्शनिय सामन्यासाठी रेवणनाथ शेलार (भ्र.9075476791),
चित्रकला प्रदर्शनाकरीता प्राचार्य पी.एम.मुखेकर (भ्र.9420752364) व श्रीकांत पुरी
(भ्र.9423473613), इतर माहितीसाठी क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर (भ्र.9422243435)
यांच्याशी संपर्क साधावा तसेच जिल्ह्याच्या मुख्यालय सोडून इतर तालुक्यातील शाळा, विद्यालये,
महाविद्यालये, क्रीडा मंडळे, युवक मंडळे,क्रीडा संस्था, युवक संस्था यांनी कार्यक्रम
आयोजित करुन अहवाल जिल्हा क्रीडा कार्यालयास सादर करावा. असे बीडचे जिल्हा क्रीडा अधिकारी
यांनी कळविले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा