मंगळवार, १० जानेवारी, २०१७

जिल्ह्यातील आस्थापनांनी 30 जानेवारीपर्यंत माहिती सादर करावी



            बीड, दि.10:- जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय, सार्वजनिक, खाजगी कार्यालयाच्या आस्थापनांनी सेवायोजन कार्यालय (रिक्त पदे सक्तीने अधिसुचित करणारा) कायदा 1959 नियमावली 1960 नूसार प्रत्येक तिमाहीचे त्रैमासिक विवरणपत्रे 30 दिवसाच्या आत सेवायोजन कार्यालयात सादर करणे बंधनकारक असून माहे डिसेंबर-2016 अखेरचे ई-आर-1 सोमवार दि.30 जानेवारी 2017 पर्यंत सादर करणे कायद्याने बंधनकारक आहे अन्यथा आस्थापणा कायद्यातील कलम 4(2) व 5(2) नूसार कार्यवाही होऊ शकते.

            शासकीय, निमशासकीय कार्यालयांनी त्यांच्या कार्यालयाचा ई-आर-2 भरताना माहे सप्टेंबर-2016 रोजीच्या कर्मचारी संख्येनूसार भरण्यात यावा. या करीता विभागाच्या www.maharojgar.gov.in या संकेतस्थळावर माहिती भरताना उच्चपदानूसार उतरत्याक्रमाने भरण्यात यावा. जो पर्यंत कर्मचारी संख्या बरोबर टंकलिखित होऊन बरोबर येत नाही तोपर्यंत सेव्ह डिटेल्स मध्येच काम करावे फायनल करण्यात येऊ नये कर्मचारी संख्या बरोबर आल्यास त्याची प्रिंट घेण्यात यावी. माहे डिसेंबर-2016 चा ई-आर-1 ची एक प्रत व ई-आर-2 च्या दोन प्रती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,बीड या कार्यालयात सादर करुन प्रमाणपत्र घ्यावे व माहे जानेवारी 2017 च्या वेतन देयकाबरोबर प्रमाणपत्र सादर करावे याची सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांनी नोंद घ्यावी. असे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र बीडचे सहायक संचालक यांनी कळविले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा