बीड, दि. 14 :- सागर राम बिराजदार वय 12 वर्षे रा. शिवाजीनगर,
परळी वैजनाथ जि.बीड यास दि.25 सप्टेंबर 2015 रोजी राहत्या घरातून अज्ञान व्यक्तीने
पळवून नेले आहे. मुलाचे वर्णन उंची 4.5 फुट, रंग काळा-सावळा, बांधा सडपातळ, चेहरा गोल,
केस काळे, नाक सरळ, भाषा मुका व बहिरा, डोळे काळे, ओळख खुण उजव्या हातावर सोमनाथ असे
नाव गोंदण, पोशाख निळ्या रंगाची जिन्स व चौकडा शर्ट असे आहे. तरी या वर्णाचा मुलगा
दिसून आल्यास अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष, पोलीस अधिक्षक कार्यालय, बीड दुरध्वनी
क्र.02442-231933 आणि पोलीस उपनिरीक्षक डी.व्ही.गित्ते एएचटीयु बीड (मो.9763320191)
यांच्याशी संपर्क साधावा. असे पोलीस उपनिरीक्षक
डी.व्ही. गित्ते यांनी कळविले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा