बीड दि. 14 :- वीरशैव धर्मियाचे श्रध्दास्थान असलेल्या
बीड तालुक्यातील कपीलधार येथील
श्री मन्मथस्वामी देवस्थान येथे राज्याच्या ग्राम विकास, महिला व बाल विकास
मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ना.
पंकजाताई मुंडे यांच्या शुभहस्ते शासकीय महापूजा
करण्यात आली. यावेळी राज्याचे वित्त आणि नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार, महाराष्ट्र
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार जयदत्त क्षीरसागर, जिल्हाधिकारी
नवल किशोर राम, शिवाचार्य महाराज अहमदपुरकर, प्रा. मनोहर धोंडे, माजी आमदार शिवशरण
पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
कपीलधार तीर्थक्षेञ समस्त वीरशैव समाजाचे श्रद्धास्थान
असून देशभरातील भाविक याठिकाणी दरवर्षी येतात. कार्तिक पोर्णिमेस मन्मथ स्वामी यांचा
साक्षात्कार दिन साजरा केला जातो. यानिमित्ताने ही महापुजा करण्यात येते. या महापुजेसाठी
राज्यभरासह कर्नाटक राज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक या सोहळ्यास उपस्थिती लावतात.
यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर व भाविक
मोठया संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा