मंगळवार, १५ नोव्हेंबर, २०१६

प्रधानमंत्री पिक विमा योजना-रब्बी हंगाम जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील पिकांचा विमा हप्ता भरावा - जिल्हाधिकारी नवल किशोर राम


बीड दि. 15 :- जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस झाला असल्याने पीक परिस्थितील चांगली आहे. खरीप हंगामापेक्षा रब्बी हंगामातील पिक विम्याच्या हप्त्याचे दर कमी असल्याने जास्तीत शेतकऱ्यांनी 31 डिसेंबर 2016 पुर्वी रब्बी पिकांचा विमा हप्ता भरून प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी  नवल किशोर राम यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम-2016-17 ची जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक संपन्न झाली. यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम बोलत होते. या बैठकीस कृषी उपसंचालक बी.एम.गायकवाड, कृषी विकास अधिकारी जे.बी. कुलकर्णी यांच्यासह विविध बँकांचे अधिकारी आणि प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले की, जरी जिल्हयातील पीक  परिस्थिती चांगली असली तरी मागचा अनुभव लक्षात घेता वातावरणामध्ये  केंव्हाही बदल होवुन नैसर्गीक आपत्तीचे संकट उदभवु शकते यामुळे 100 टक्के शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील पीक विमा उतरुन घेणे गरजेचे आहे. कारण या पीक विम्यामुळे संभाव्य नुकसानीपासून संरक्षण मिळू शकेल. खरीप हंगामापेक्षा रब्बी हंगामातील पीक विम्याच्या हप्त्याची रक्कम कमी आहे. बँकेत पिक विमा हप्ता भरण्याकरीता येणाऱ्या सर्व शेतकऱ्यांचा पिक विमा हप्ता भरून घेण्यात यावा. याबाबत कोणत्याही तक्रार येणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच सद्यपरिस्थितीमध्ये सर्वच बँकामध्ये नोटा बदलवून देण्याचे काम सुरु असल्याने त्यांच्यावर कामाचा अधिक ताण लक्षात घेता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने पीक विमा उतरवून घेण्याच्या कामात पुढाकार घ्यावा असेही सांगितले.  
 नैसर्गीक आपत्ती ,कीड आणि रोगामुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे.पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परीस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थीक स्थैर्य आबाधित राखने.कृषि क्षेत्राच्या पतपुरवठयात सातत्य राखणे ही प्रधानमंत्री  पीक विमा योजना रब्बी हंगाम-2016-17 ची प्रमुख उद्दिष्टे आहेत.
कर्जदार शेतकऱ्यांना अधिसुचित क्षेत्रातील अधिसुचित पिकांसाठी बंधनकारक असुन बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. खातेदारांच्या व्यतिरिक्त कुळाने अगर भाडेपटटीने शेती करणारे शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. तकऱ्यांवरील विमा हप्त्याचा भार कमी करण्यासाठी शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता हा खरिप हंगामासाठी 2 टक्के,रब्बी हंगामासाठी 1.5 टक्के व नगदी पिकांसाठी  5 टक्के असा मर्यादीत ठेवण्यात आला आहे. जोखिमस्तर सर्व पिकांसाठी 70 टक्के असा निश्चित करण्यात आला आहे.अधिसुचित क्षेत्रातील अधिसुचित पिकांचे उंबरठा उत्पन्न हे मागील 7 वर्षाचे सरासरी उत्पन्न (नैसर्गीक आपत्ती जाहीर झालेली 2 वर्ष वगळून )गुणीले त्या पिकाचा जोखिमस्तर विचारात घेवुन निश्चित केले जाईल. जोखमीच्या व्याप्ती वाढविण्यात आली असुन त्या खालील प्रमाणे आहेत. पिक पेरणी पासून काढणी पर्यंतच्या कालावधित नैसर्गीक आग,विज कोसळणे,गारपीट,चक्री वादळ,पूर, भुस्खलन,दुष्काळ,पावसातील खंड,किड व रोग इत्यादी बाबीमुळे उत्पन्नात येणारी घट. हवामान घटकांच्या प्रतिकूल परीस्थीतीमुळे पिकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान. पिकांच्या हंगामामध्ये हवामानातील प्रतिकूल परिस्थीतीमुळे पिकांचे होणारे नुकसान. काढणी पश्चात नुकसान.स्थानीक नैसर्गीक आपत्तीमुळे होणारे नुकसानची भरपाई मिळणार आहे. अशा प्रकारे या पीक विमा योजनेची व्याप्ती वाढविण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

पंतप्रधान पीक विमा योजना रब्बी हंगाम 2016-17 अंतर्गत समाविष्ट पिके व विमा संरक्षित रक्कम/हप्ता पुढीलप्रमाणे आहेत. गहू (बागायती) पीकासाठी विमा संरक्षित रक्कम 33 हजार रुपये प्रती हेक्टर असून शेतकऱ्यांनी पीक विमा हप्ता भरणा करण्याची रक्कम 217.80 रू.प्रति हेक्टर अशी आहे. रब्बी ज्वारी (बागायती) पीकासाठी विमा संरक्षित रक्कम 26 हजार रुपये प्रती हेक्टर असून शेतकऱ्यांनी पीक विमा हप्ता भरणा करण्याची रक्कम 379.60 रू.प्रति हेक्टर अशी आहे. रब्बी ज्वारी (जिरायती) पीकासाठी विमा संरक्षित रक्कम 24 हजार रुपये प्रती हेक्टर असून शेतकऱ्यांनी पीक विमा हप्ता भरणा करण्याची रक्कम 379.60 रू.प्रति हेक्टर अशी आहे. हरभरा पीकासाठी विमा संरक्षित रक्कम 24 हजार रुपये प्रती हेक्टर असून शेतकऱ्यांनी पीक विमा हप्ता भरणा करण्याची रक्कम 297.60 रू.प्रति हेक्टर अशी आहे.करडई पीकासाठी विमा संरक्षित रक्कम 22 हजार रुपये प्रती हेक्टर असून शेतकऱ्यांनी पीक विमा हप्ता भरणा करण्याची रक्कम 330 रू.प्रति हेक्टर अशी आहे. सूर्यफुल पीकासाठी विमा संरक्षित रक्कम 22 हजार रुपये प्रती हेक्टर असून शेतकऱ्यांनी पीक विमा हप्ता भरणा करण्याची रक्कम 330 रू.प्रति हेक्टर अशी आहे. तर रब्बी कांदा पीकासाठी विमा संरक्षित रक्कम 60 हजार रुपये प्रती हेक्टर असून शेतकऱ्यांनी पीक विमा हप्ता भरणा करण्याची रक्कम 396 रू.प्रति हेक्टर अशी आहे. शेतकऱ्यांनी विमा प्रस्ताव बँकेकडे सादर करण्याची अंतिम तारीख दि.31 डिसेंबर 2016 असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा