शनिवार, १२ नोव्हेंबर, २०१६

बालदिन व बालकामगार प्रथा विरोधी सप्ताहानिमित्त जनजागृती रॅलीचे आयोजन



            बीड, दि. 11 :- जिल्हाधिकारी कार्यालय बीड अंतर्गत राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पाने 14 नोव्हेंबर बालदिन व 14 ते 21 नोव्हेंबर 2016 या कालावधीत बालकामगार प्रथा विरोधी सप्ताहानिमित्त दि.14 नोव्हेंबर रोजी बीड येथे बालकामगार प्रथा विरोधी संदेश देणाऱ्या जनजागृतीविषयक रॅलीचे आयोजन केले आहे.

            दि.14 ते 21 नोव्हेंबर या कालावधीत बीड जिल्ह्यातील सर्व तालुका शहरामध्ये बालकामगार प्रथा विरोधी संदेश देणाऱ्या चित्ररथाच्या माध्यमातून जनजागृती विषयक कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले असून हा चित्ररथ बालकामगार प्रथा विरोधी कायदा व बालकामगार मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात दाखल करण्यासाठी जनजागृती करणार आहे. जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते, संस्था, संघटना, अधिकारी, व्यापारी, महिला, शिक्षक आणि बालप्रेमी नागरिकांनी रॅलीच्या उदघाटन प्रसंगी दि.14 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता जिल्हा‍ परिषद कन्या शाळा, शिवाजी चौक, बीड येथे आणि समारोप प्रसंगी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे सकाळी 11 वाजता उपस्थित रहावे. असे आवाहन राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पाचे प्रकल्प संचालक ओमप्रकाश गिरी आणि जिल्ह्यातील बालकामगार विशेष प्रशिक्षण केंद्र चालवणाऱ्या संस्थांच्या वतीने करण्यात आले आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा