गुरुवार, १० नोव्हेंबर, २०१६

डिसेंबर महिन्याचे धान्याचे नियतन मंजूर



            बीड, दि. 10 :- माहे डिसेंबर  2016 या महिन्यासाठी बीड जिल्ह्याकरीता प्राधान्य कुटुंबातील लाभार्थी आणि अंत्योदय अन्न योजनेंतर्गत गहू, तांदुळ स्वस्त धान्य दुकानामार्फत जिल्ह्यातील पात्र कार्ड धारकांना वितरित करण्यासाठी नियतन मंजूर झाले आहे. हे नियतन एकूण 22 गोदामामार्फत स्वस्त धान्य दुकानांना वितरित करण्यात येणार आहे.

            यामध्ये वखार महामंडळ, परळी वैजनाथ येथून  एनएफएसए प्राधान्य कुटुंब योजनेअंतर्गत गहू 1000 मे.टन व तांदूळ 1484 मे.टन, अंत्योदय योजनेअंतर्गत  गहू 677.380 मे.टन व तांदूळ 451.260 मे.टन. पीपीपी परळी वैजनाथ केसोना येथून एनएफएसए प्राधान्य कुटुंब योजनेअंतर्गत गहू 2726 मे.टन व तांदूळ 1000 मे.टन आणि अन्न महामंडळ अहमदनगर/नागापूर पीईजी येथून एनएफएसए प्राधान्य कुटुंब योजनेअंतर्गत गहू 1195 मे.टन व तांदूळ 797 मे.टन, अंत्योदय योजनेअंतर्गत  गहू 113.510 मे.टन व तांदूळ 75.010 मे.टनाचा पुरवठा होणार असल्याचे बीडचे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी कळविले आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा