बीड, दि. 9 :- भारत सरकारने भारतीय चलन बाजारातील 500 व 1000
रुपयांच्या चलनी नोटा बंद करण्याचे आदेश दिले आहेत. परंतु पेट्रोल पंप परवानाधारकांनी
शासन आदेशान्वये दि.11 नोव्हेंबर 2016 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत सर्व पेट्रोल पंपावर
500 रुपये व 1000 रुपयांच्या चलनी नोटाचा स्विकार करावा आणि पेट्रोल पंपावर येणाऱ्या
ग्राहकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी. असे जिल्हाधिकारी, बीड यांनी कळविले
आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा