बीड, दि.
3 :-जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहामध्ये विक्रीकर दिन उत्साहात साजरा करण्यात
आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी जिल्हाधिकारी नवल किशोर राम व निवासी उपजिल्हाधिकारी
चंद्रकांत सुर्यवंशी यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करुन कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात
आले.
जिल्ह्यातील
व्यापारी व उद्योजक मेहनती असल्याचे सांगून कृषी मालावर आधारित उद्योग प्रक्रीया केंद्र
विकसीत करण्यासाठी उद्योजकांनी एकत्र येण्याची गरज असून त्यासाठी जिल्हा प्रशासन योग्य
ते सहकार्य करील असे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी यावेळी मार्गदर्शन करतांना सांगितले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने जिल्ह्यातील सर्वाधिक
विक्रीकर भरणारे दिप एजन्सीचे प्रदिप चितलांगे, गजानन एक्सट्रॅक्शनचे भागीदार अशोक
भाला व गोपाल टावरी आणि लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी
संचालक महादेव घोरपडे यांचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र,
सन्मानचिन्ह देवून सन्मानित करण्यात आले. तसेच उत्कृष्ट सेवा बजावणारे विक्रीकर अधिकारी
संतोष कांबळे व विवेक वाळुजकर आणि विक्रीकर निरीक्षक प्रदिप फाटे, सतिश डोंगरे, विकास
ठोसर यांना प्रशस्तीपत्र देवून गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाचे
प्रास्ताविक विक्रीकर अधिकारी विवेक वाळुजकर यांनी प्रास्ताविक केले तर सुत्रसंचालन
गोविंद लोळगे यांनी केले. आभार प्रदिप फाटे यांनी मानले. या कार्यक्रमास जिल्ह्यातील
उद्योजक, व्यापारी, सनदी लेखापाल, कर सल्लागार यांच्यासह विक्रीकर कार्यालयातील सर्व
अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा