सोमवार, ३ ऑक्टोबर, २०१६

शहिद सैनिक परिवाराच्या कल्याणासाठी ध्वजदिन निधीमध्ये मदत करण्याचे आवाहन


          बीड, दि. 3 :- अतिरेकी कार्यवाहीमध्ये  देशाच्या रक्षणार्थ जीवाचे बलीदान देणाऱ्या शहिदांच्या कुटूंबाच्या पुनर्वास व कल्याणासाठी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांच्या नावे असलेल्या खात्यावर ध्वजदिन निधीमध्ये सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले आहे.

            उरीमध्ये सैनेत तैनात जवानापैकी पाकिस्तानी अतिरेक्यांच्या हल्ल्यामध्ये 18 शहिद जवानामध्ये महाराष्ट्राचे चार भुमिपूत्र आहेत. शुरवीरांचे बलिदान व साहसपूर्ण कार्य पाहता त्यांच्या कुटूंबास महाराष्ट्र शासनाने प्रत्येकी 15 लाख रुपयाची मदत देण्याची घोषणा केली आहे. ती मदत ध्वजदिन निधी म्हणून गोळा केलेल्या रक्कमेतून दिली जाते असून जिल्हामध्ये ध्वजदिन निधीचे जिल्हाधिकारी हे अध्यक्ष असतात. ध्वजदिन निधीतून सैनिकांच्या इतर कल्याणकारी योजना पण राबविल्या जातात. म्हणून त्या शुरवीरांच्या कुटूंबाच्या कल्याणासाठी सढळ हाताने मदत करावी असे बीडचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी कळविले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा