बीड, दि.4 :- अहमदनगर-बीड-परळी वैजनाथ रेल्वे मार्गासाठी
संपादित झालेल्या, होणाऱ्या काकडहिरा येथील गट नंबर 09, 13, 32, 33, 80 व 93 तसेच
मौजे पिंपरगव्हाण येथील गट नंबर 172 व 175 मधील ज्यांची जमीन ही रेल्वेमार्गासाठी
संपादित झालेली आहे किंवा होत आहे अशा सर्व खातेदारांना, धारकांनी उपजिल्हाधिकारी,
भुसंपादन लघु पाटबंधारे विभाग,बीड यांच्याकडून भुमिअभिलेख कार्यालयास प्राप्त
नगर-बीड-परळी रेल्वे मार्गासाठी संपादित होणाऱ्या जमीनी, क्षेत्राबाबतच्या तक्रारी,
आक्षेप अर्जाची खात्री, पडताळणी करण्यास भुमि अभिलेख कार्यालयाचे भूमापक
एस.आर.बागुल (मो.9404592596) हे दि.7 व 8 ऑक्टोबर 2016 रोजी मौजे काकडहिरा व मौजे
पिंपरगव्हाण येथे प्रत्यक्ष जागेवर येणार आहेत. तरी संबंधितांनी सकाळी 10
वाजेपासून ते काम संपेपर्यंत आपआपल्या गटात संपादित जागेवर आपला मालकी हक्क सिध्द
करणाऱ्या पुराव्यानिशी हजर रहावे व भूमापक यांना चौकशी कामी सहकार्य करावे. असे
बीडचे भूमिअभिलेख कार्यालयाचे प्रभारी उप अधिक्षक यांनी कळविले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा