मंगळवार, ४ ऑक्टोबर, २०१६

भुसंपादन संयुक्त मोजणीसाठी जागा मालकांना हजर राहण्याचे आवाहन



            बीड, दि.4 :- बीड येथील अहमदनगर-बीड -परळी वैजनाथ नवीन रेल्वे मार्गासाठी यापूर्वी झालेल्या संपादन क्षेत्रास लागून राहणारे वाढीव अतिरीक्त क्षेत्राच्या संयुक्त मोजणीचे काम दि.6 ऑक्टोबर ते 8 ऑक्टोबर 2016 अथवा कामसंपेपर्यंत सर्व्हे नंबर तरफ पिंगळे 151, 137, 138, 155, 156, 153, 154 आणि तरफ बलगुजार सर्व्हे नंबर 90, 92, 100, 102, 103 इत्यादी गटामध्ये मोजणी काम करण्यात येणार असल्याने खातेदार, मालकांनी अतिरिक्त संयुक्त मोजणीच्या तारखेस आपल्या मालकी हक्काच्या पुराव्यासह 7/12 उतारा 8 अच्या उताऱ्यासह आपल्या सर्व्हे नंबरमध्ये जमिनीवर हजर रहावे. तसेच भुसंपादन संयुक्त मोजणी प्रकरणात प्राप्त झालेल्या आक्षेप अर्जाच्या चौकशी, मोजणी आक्षेप अर्जदारांनी जायमोक्यावर हजर रहावे. हजर न राहिल्यास आपले काहीही म्हणने नाही असे गृहीत धरण्यात येईल. असे बीडचे भूमिअभिलेख कार्यालयाचे प्रभारी उप अधिक्षक यांनी कळविले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा